माधव दामले
हे या सर्व संस्थांचे संस्थापक व प्रमुख आहेत. टेल्को, पुणे येथे काही काळ नोकरी, त्यानंतर स्वतःचा प्रिंटींगचा व्यवसाय, तो करताना अर्थशिल्प या साप्ताहिकाची स्थापना.
लायन्स क्लब पुणे भोसरी मार्फत सामाजिक काम, पॉलिटिकल कंसल्टंसी - निवडणूक काळात उमेदवारासाठी सर्व प्रकारची कामे, राजकीय लेखन, लघुकथा, या बरोबर अनेक रोटरी क्लब्स, लायन क्लब्स,
ज्येष्ठ नागरीक संघ येथे ज्येष्ठांसाठी लिव्ह इन कसे फायद्याचे या संदर्भात भाषणे करून जन जागृतीचे काम चालू आहे. वाई येथे श्री स्वामी समर्थ शक्तीपीठ व मनःशांती केंद्र, वृद्धाश्रम यांची स्थापना व कार्य.
वधु किंवा वराची योग्य निवड करून योग्य वयात सुखाचा संसार व्हावा ह्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत यासाठी वधुवरपसंती या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.